संपादक जगदीश वेन्नम/रमेश बामनकर
गडचिरोली– चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील कुणघाडा फाटा जवळील अपूर्ण नाला बांधकामामुळे लगतच्या 3 एकर शेतीचे मोठे नुकसान झाले आज दि. 26 आगस्ट रोजी खासदार अशोक नेते यांनी कुनघाडा फाट्याजवळील शेतीची पाहणी केली असता अपुऱ्या नाल्याच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी शेतात गेल्याने पूर्ण पिकांची नासधूस झाल्याचे निर्दशनास आले.
पाणी शेतात साचून राहिल्याने पेरणी केलेले पूर्ण पीक सडून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. याची वेळीच दखल घेत खासदार अशोक नेते यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदार यांना तात्काळ संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी दिशा समितीचे सदस्य प्रकाश गेडाम, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, स्वीयसहाय्यक रविंद्र भांडेकर उपस्थित होते.