(निधन वार्ता) रामपूर चक येथील वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ ह.भ.प.धर्माजी शिंदकार यांचा देहावसान

0
165

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
(गडचिरोली जिल्हा)

आरमोरी तालुका मुख्यल्यापासून अगदी जवळ असलेल्या रामपूर (चक) येथील बालपणापासून भक्ती मार्ग स्वीकारून, विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतुन जीवन जगणारे व वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ ह.भ.प. धर्माजी मादगू शिंदकार महाराज यांचा ७०व्या वर्षी दि. २६/०८/२०२० रोजी दुपारी ४.०० वा. अल्पशा आजाराने देहावसान झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी,३मुली, १मुलगा व नातवंडासह बराच मोठा आप्तपरिवार आहे. ते सतत कोणतेही स्वार्थ न करता परमार्थ साधण्याकडे लक्ष द्यायचे. यामुळे रामपूर चक परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाला आहे.