आज जिल्ह्यात 50 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण

0
187

 

प्रतिनिधी / गौरव मुळ्ये.

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात आणखी 50 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3575 झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्ण संख्येत होणारी वाढ चिंताजनक आहे. नागरिकांनी सतर्क राहून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नव्याने सापडलेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरीतील 26 तर ॲन्टीजेन टेस्टमधील रत्नागिरी 4, कळबणी 6, कामथे 2, चिपळूण 3, दापोली 8, परकार हॉस्पीटल 1 एकूण 50 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातआज दळवटणे, चिपळूण येथील एका 48 वर्षीय कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 124 मृत्यू झाले आहेत.11511 होम कोरोन्टाईन रुग्ण असून, 1220 अँक्टिव्ह पॉझिटिव्ह रूग्ण आहेत.

*दखल न्यूज भारत*