खेड तालुक्यातील होडखाड वरची वाडी येथील ५० वर्षीय प्रौढाचा खून

0
184

 

प्रतिनिधी / प्रसाद गांधी.

खेड : खेड तालुक्यातील खाडी पट्टा भागातील होडखाड वरची वाडी येथील ५० वर्षीय नारायण सदू शिगवण या प्रौढाची होडखाड बस थांब्या नजीक प्रौढाची डोक्यात धारदार शस्रने वार करीत खून केल्याचा प्रकार बुधवारी उघड झाला आहे. .
प्रकरणी यशवंत शांता राम शिगवण यांनी येथील पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून अज्ञाता वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी घडला होता. गणेशोत्सव असताना खुनाचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात मारेकऱ्यांने ५० वर्षीय नारायण शिगवण यांच्या डोक्यात धारदार शस्त्र ने डोक्यात चेहऱ्यावर व गुप्तनागवर वार करून त्यांना ठार मारले त्यांचा मृतदेह सापडू नये याकरिता गावा नजीकच्या जंगलमय भागात टाकून देत पलायन केले. बुधवारी हा खुनाचा प्रकार उघड झाल्यानंतर पो. नि. सुवर्णा पत्की यांनी तपासाची चक्रे फिरवत तपास सुरू केला आहे.

*दखल न्यूज भारत*