गंदगी मुक्त भारत अभियान ,वृक्षरोपण कार्यक्रम संपन्न। पंचायत सामिती आधिकारी प्रदिप बमनोटेयांची माहिती

0
84

 

कमलसिह यादव
पाराशिवनी तालुका प्रीतानेधी
दखल न्युज भारत,नागपुर

पाराशिवनी(ता प्र) :-गंदगी मुक्त भारत अभियान अंतर्गत दिनांक 24 ऑगस्ट 2020 रोजी पंचायत समिती पारशिवनी मधील 51 ही ग्रामपंचायत मध्ये श्रमदानातून प्लास्टिक कचरा संकलन करून त्याचे योग्य विल्हेवाट लावण्याकरिता अभियानाची सुरुवात करण्यात आली सदर अभियान तालुकास्तरीय शुभारंभ ग्रामपंचायत पालोरा येथे करण्यात आला ग्रामपंचायत पालोरा येथे श्रमदानातून प्लास्टिक गोळा करण्यात आले जवळ जवळ ८ ते १०
किलो प्लास्टिक गोळा करण्यात आले
त्याच प्रमाणे पंचायत समिती पारशिवनी मार्फत covid-19 कोरोणा बाबत जनजागृती करता भिंती पत्रके तयार करून वाटण्यात आले व लोकांना कोणत्याही प्रकारचे लक्षणे आढळल्यास त्याचप्रमाणे संशय वाटल्यास तोरणा चाचणी करण्या बाबत आवाहन करण्यात आले
गंदगी मुक्त भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायत परिसरात वृक्षारोपण करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
यावेळी पंचायत समिती पारशिवनी च्या सभापती मीनाताई प्रफुल्ल कावळे त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उपसभापती चेतन जी देशमुख पंचायत समितीच्या सदस्य मंगलाबाई निंबोन , करुणाताई भोवते त्याच प्रमाणे पंचायत समिती गटविकास अधिकारी प्रदीप बमनोटे ,सहाय्यक गटविकास अधिकारी अनिल आकुलवार जिल्हा समन्वयक आशिष रावडे जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष ग्रामपंचायत सरपंच प्रकाश कांमडे ग्रामसेवक विनायक गाहाने ,गटशिक्षणाधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामपंचायतीचे सर्व माननीय सरपंच ,ग्राम पंचायत सदस्य पोलीस पाटील पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग गट संसाधन केंद्र चे मुनेश दुपारे देवानंद तुङताम, शुभांगी कांबळे ग्रामसेवक श्री बांबल ,श्री ठवरे ,श्री गावंडे ,श्री लोखंडे व इतर सर्व गावकरी मंडळी अंगणवाडी सेविका शिक्षक वर्ग मदतनीस उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन मुनेश दुपारे समन्वयक आभार प्रदर्शन विनायक गहाणे ग्रामसेवक पालोरा यांनी केले कार्यक्रमाला सहकार्य ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत ग्रामसेवक मंडळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग पंचायत समिती पारशिवनी यांनी केले