हर्ष साखरे तालुका प्रतिनिधि आरमोरी
9518913059
दिनांक-२६/०८/२०२०
स्थानिक नगर परिषद क्षेत्रातील कोरोणा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी संपूर्ण शहरात फवारणी करून निर्जंतकीकरण करावे तसेच शहरातील पथदिवे व इथर मुलभूत समस्या मार्गी लावावेत अशी मागणी करून आरमोरि भा.ज.पा. च्या वतीने नवनियुक्त न.प. मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांचे स्वागत करण्यात आले.
सध्या कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे आणि सध्या सणासुदीचे दिवस असल्याने लोकांच्या आरोग्याची समस्या वाढू नये आणि आरमोरि शहर कोरोनामुक्त राहावे यासाठी आरमोरि भा.ज.पा. च्या वतीने मुख्याधिकारी न. प. आरमोरि यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी ता. लु.का. युवामोर्चा प्रमुख पंकज खरवडे, तालुका प्रमुख नंदुजी पेट्टेवार, युवा कार्यकर्ते अमोलभाऊ खेडकर, जितेंद्र ठाकरे, युगल समृत्वार, संजय सोनटक्के, रुपेश पुणेकर, अमितसिंह राठोड आदी. उपस्थित होते.