आल्लापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रिय महामार्गाचे झाले दुरअवस्था जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास

0
112

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रीय महामार्ग म्हणून आष्टी ते आलापली ते सिरोंचा हा मार्ग नावाजलेला आहे . या महामार्गावर जड वाहने 24 तास चालतात.
महामार्ग हा पूर्णतः खड्डेमय मार्ग झाला आहे.या मार्गावर पूर्णतः खड्डे तयार झाल्यामुळे वाहन धारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि या खड्ड्यामध्ये मुळे या मार्गावर अनेक अपघात घडले आहेत.काही जणांना प्राणाला मुकावे लागले.
बया मार्गावर खड्डे आहेत की,खड्ड्यात मार्ग आहे असे प्रश्न निर्माण होत आहे.या मार्गावर प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
या मार्गावर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तामिळनाडू, राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, चेन्नई, पंजाब व अन्य राष्ट्रातील जड वाहने रात्रंदिवस चालतात करिता या मार्गाची दुरावस्था झाली आहे.लहान वाहने चालविण्यास खुप त्रासाचे व अडचणीचे जाते आणि या मार्गावर प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देने आहे.
जिल्ह्याचे खासदार व आमदार किंवा प्रशासनाने या मार्गाची दखल घेऊन मार्ग दुरुस्ती करावी अन्यथा नवीन सिंमेंट कांक्रिट रोड टाकावी असे जनसामान्यांची मागणी आहे.