सावली तालुक्यात आढळले एकाच दिवशी विस कोरोना पॉझिटिव्ह कोरोनाच्या शिरकावमुळे खेड्यापाड्यात भितीचे वातावरण

0
487

 

सावली ..सुधाकर दुधे
जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस आता महाराष्ट्र राज्यातही थैमान घालत असून सावली तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाने शिरकाव केल्यामुळे नागरिकांमध्ये कोरोनाची भिती अधिक वाढली आहे.
सावली तालुक्यात एकाच दिवशी २० कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. यात पाथरी १, सामदा बु. १, आणि व्याहाड बु. १८ असे एकूण २० रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. व्याहाड बु. येथील एकाच कुटुंबातील रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. आणखी आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर रूग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड बु येथेच करण्यात येत आहे. ४९ टेस्टिंग आज झाली. त्यात १९ पॉझिटिव्ह निघाले आहेत तर १ पाथरी एकूण विस रुग्ण दिवसभरात आढळून आले आहेत.
कोरोना व्हायरस चीनपासून सुरू झालेल्या आजमितीला जगातील अनेक देशांत पसरला असून कोरोना व्हायरसचा प्रभाव जगभरासह भारत देशात वाढत आहे . वेगवेगळे उपचार पध्दती , लसीकरण करून ही रोग आटोक्यात येत नसल्याने भयानक चिंता वाटत आहे . या वाढणाऱ्या रोगाची व्याप्ती आजमितीस ग्रामीण भागात असणाऱ्या सावली तालुक्यातही येऊन टेपलेला आहे . तत्पूर्वी साध्या प्रकाराची सर्दी , ताप , खोकला , श्वास घेताना त्रास , डोकेदुखी आदी आजार असले तरी नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे .
‘व्याहाड बु. येथील एकाच कुटुंबातील रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. आणखी आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर रूग्णांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड बु येथेच करण्यात येत आहे. सर्व रुग्णांना सर्दी ताप खोकला या आजाराची लक्षणे आढळून आल्याने त्यांची एन्टीजन्सी टेस्ट जागेवरच करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या चमु सोबत प्रशासकीय यंत्रणा तळ ठोकून आहेत.४९ टेस्टिंग आज झाली. त्यात १९ पॉझिटिव्ह निघाले. बाकी टेस्टिंग उद्या सावली येथे होणार आहे. गाव सिल करण्याविषयी वरून आदेश यायचं आहे.
डॉ. मडावी ता. वैद्यकीय अधिकारी सावली
डॉ. धुर्वे, वैद्यकीय अधिक्षक
ग्रा.रुग्नालय सावली
कोरोना रोगाची जनजागृती करण्याची गरज
शासनाने प्रबोधन करण्यासाठी ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या आरोग्य विभागातील अधिकारी , कर्मचारी यांनी पोलिओ डोसप्रमाणे गाव वाडीवर लोकांत जाऊन जनजागृती करण्याची गरज आहे . म्हणजे गावकरी आपला बचाव करू शकतील.
आजार टाळण्यासाठी काळजी घ्यावी
कोरोना रोग विषाणू जन्य आहे . हा रोग टाळण्यासाठी चांगले मास्क आणि स्वच्छ हात पाय करण्यासाठी एक चांगला साबण वापरावे.कोरोना रोगाबद्दल आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू झालेला आहे . या विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी सरकार सर्व शक्य ती पावले उचलत आहे . जर त्यानुसार कोरोनाबद्धल अफवा किंवा कोणतीही माहिती सरकारखेरीज अन्य कोणीही प्रसारित करणे हा दखलपात्र गुन्हा असून तसे केल्यास कारवाई होऊ शकते .