रिपब्लिकन फोरमचे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षात विलीनीकरण

0
179

उपसंपादक/ अशोक खंडारे
गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे नऊ महिन्यापुर्वी स्थापन करण्यात आलेल्या रिपब्लिकन फोरम या संघटनेचे दि.२५ ऑगस्ट २०२० रोजी शेवटी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष या राजकीय पक्षात विलीनीकरण करण्यात आले.
रिपब्लिकन फोरमचे संयोजक रोहिदास राऊत यांनी अ.भा.रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण उर्फ बाळासाहेब खोब्रागडे यांच्या उपस्थितीत चांदेकर भवन गडचिरोली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही घोषणा केली.
या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.अशोक निमगडे, युवानेते प्रतिक डोर्लीकर, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, जेष्ठ नेते कुलपती मेश्राम, महिला नेत्या सुरेखाताई बारसागडे, प्रा.राजन बोरकर, निता सहारे, प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
भरिप बहुजन महासंघ बरखास्त करण्याची कृती बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेलाच नष्ट करणारी असल्याचा ठपका ठेवुन पक्षाचे शेकडो कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीतुन रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात बाहेर पडले होते व रिपब्लिकन फोरम या नावाने कार्यरत होते.
याप्रसंगी बोलतांना बाळासाहेब खोब्रागडे यांनी रिपब्लिकन फोरमच्या विलीनीकरणाचे स्वागत केले व यामुळे रिपब्लिकन पक्ष निश्चितच बळकट होईल असा विश्वास व्यक्त केला. रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व दिवंगत नेते बॅरीष्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रेरणेने काम करणारा पक्ष असुन सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्यरत राहील असे सांगितले.
रोहिदास राऊत यांनी रिपब्लिकन फोरमचे रिपब्लिकन पक्षात विलीनीकरण ही अतिशय महत्वपुर्ण घटना असल्याचे सांगुन रिपब्लिकन चळवळ हीच खऱ्या संपुर्ण दलित शोषीतांना न्याय मिळवुन देण्याची चळवळ असल्याचे प्रतिपादन केले व हा पक्ष आपण अधिक बलशाली करू अशी ग्वाही दिली.
या बैठकीला हंसराज उंदिरवाडे, तैलेश बांबोळे, योगेश टेंभुर्णे, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, अनिल बारसागडे, पुंजाराम जांभुळकर, राजु वाकडे, पुरूषोत्तम उंदिरवाडे, वनमाला झाडे, प्रल्हाद रायपुरे, जिजाबाई सुखदेवे, पुणेश्वर वड्डे, सिमाताई पोट्टाला, दुर्योधन सहारे, धर्मेंद्र वंजारे, प्रदिप सोरते, मंगेश कांबळे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.सदर बैठकीचे संचालन व आभार प्रदर्शन संदिप रहाटे यांनी केले.