छोरीया लेआउट मध्ये वेकोली कामगाराचा मुत्युदेह आढळला

0
420

 

वणी : परशुराम पोटे
वणी शहरानजिक असलेल्या छोरीया लेआउट मध्ये वेकोली कामगाराचा म्रुत्युदेह आढळुन आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
भास्कर महादेव वाभीटकर (५५) असे म्रुतकाचे नाव आहे. भास्कर वाभिटकर यांचे कुटुंब पोळ्याच्या सनानिमीत्य डोंगरगाव येथिल शेतात गेले होते. परंतु भास्कर वाभीटकर हे तिथून परत आले व घरी एकटेच राहत होते. आज बुधवारी दि.२६ ला सकाळी १० वाजताचे सुमारास घरच्या मंडळीना फोन द्वारे सुचना मिळाली कि, राहत्या घरी भास्कर हे मुत अवस्थेत आढळून आले आहे. या माहिती वरून आज दुपारी पाच वाजताचे दरम्यान वणी पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. असुन म्रुत्युदेह शवविच्छेदनाकरीता येथिल ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले.त्या म्रुत्युदेहावर शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मुत्यूचे नेमके कारन समजणार आहे. मुतक हे गोवरी डीप (चंद्रपुर) कोळसा खानी मध्ये कामावर असुन लाॅकडाऊन मुळे ते वणीतच मुकामी होत़े. त्याच्या मागे ऐक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परीवार आहे. त्याच्या अचानक मृत्युमुळे वेकोली शेञात शोककळा पसरली असुन वणी पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे.