महादुला नगरपंचायत हद्दीतील फुले नगर येथे एका मुलीची आत्महत्या प्रेमप्रकरणाला घरच्यांचा विरोध असल्याने केली आत्महत्या

0
4987

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

महादुला-कोराडी / नागपुर: २६ आँगस्ट २०२०
नागपुर जिल्ह्यातील कोराडी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या महादुला नगरपंचायत येथील फुले नगर मध्ये एका मुलीने घरी फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
म्रृतक कु. पुजा मनोज शाहु(१९ वर्ष) असुन तिचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. आत्महत्या करण्यापुर्वी कु. पुजा ने एक सुसाइड नोट लिहिली असुन त्यात ती ज्या मुला वर प्रेम करते त्याचे नाव लिहिले होते. त्यात तिने लिहिले की मम्मी पप्पा मैने आपका बहुत दिल दुखाया, मुझे माफ करो। मेरा  इससे प्यार करना आपको मंजुर नहीं है। इसलिए मै आपको छोड़कर जा रहीं हुँ। या सुसाईड नोट मध्ये पुजा ज्या मुलावर प्रेम करीत होती, त्याचे नाव लिहिले होते.
कु. पुजा हिने दुपारी १ च्या सुमारास फाशी घेतली. त्यानंतर ३ वाजता स्थानिक नगरसेवक तिलकचंद गजभिये व इतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कोराडी पोलिसांना याबाबत सुचना दिली त्यानंतर सायंकाळी ५ च्या दरम्यान कोराडी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पंचनामा करुन कु. पुजा शाहु हिचे प्रेत पोस्टमार्टेम करिता मेयो रुग्णालयात पाठवले आहे.