गोंदिया जिल्ह्यात 1165 कोरोनाग्रस्त आज आणखी 62 कोरोना पॉझिटिव्ह एकाचा उपचारादरम्यान मृत्यु पाच रुग्णांची कोरोनावर मात

0
179

 

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
गोंदिया दि.26 जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कोरोना संसर्गाचा फैलाव झाला आहे.जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.आज गोंदिया तालुक्यातील दासगाव येथील 40 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला.ह्या रुग्णाला हृदयविकार होता.जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या गोंदिया शहरात 51नव्या पॉझिटिव्ह रुग्णांसह जिल्ह्यात 62 रुग्ण आज आढळून आल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 1165 झाली आहे.उपचार घेत असलेल्या 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.

विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 899 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 273 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे असे एकूण 1172 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.

नवे 62 कोरोना बाधित रुग्ण आज आढळून आले.यात सर्वाधिक 51 रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे.यामध्ये गोंदिया शहरातील गणेशनगर येथील 25 रुग्ण,यादव चौक,अरूणनगर,वसंतनगर,रिंग रोड मजार, रामनगर,फुलचुर येथील प्रत्येकी एक रुग्ण, सिव्हिल लाईन येथील दोन रुग्ण,साई मंगलम रेसिडेंसी येथील तीन रुग्ण,गोंदिया तालुक्यातील कुडवा येथील श्रीरामनगरचे तीन आणि हनुमान मंदिर परिसरातील एक रुग्ण, सावराटोली -2,गिरोला-6 तेढवा-1, नंगपुरा/मूर्री -1 व दासगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बेलाटी/खुर्द येथील एक रुग्ण व नहारटोला येथील दोन रुग्णाचा समावेश आहे. आमगाव शहरातील एक रुग्ण ,सडक/अर्जुनी येथील दोन रुग्ण,देवरी येथील दोन रुग्ण व एक रुग्ण फुटाणा येथील आहे.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील एक रुग्ण आणि बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील एक रुग्ण असून यामध्ये शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथील रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1165 झाली आहे.

बाधित आढळलेले रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -526,तिरोडा तालुका-273, गोरेगाव तालुका -35, आमगाव तालुका -80, सालेकसा तालुका-41, देवरी तालुका -46,सडक/अर्जुनी तालुका -63,अर्जुनी /मोरगाव तालुका – 85 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -16 रुग्ण आहे.

जिल्ह्यात कोरोनावर मात करून आतापर्यंत 772 रुग्ण घरी गेले आहे.यामध्ये गोंदिया तालुका- 275,तिरोडा तालुका -236, गोरेगाव तालुका -28, आमगाव तालुका -53,सालेकसा तालुका -35, देवरी तालुका-40, सडक/अर्जुनी तालुका – 44, अर्जुनी/मोरगाव तालुका -57 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण 378 आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 243, तिरोडा तालुका-31, गोरेगाव तालुका -7, आमगाव तालुका -27, सालेकसा तालुका -6, देवरी तालुका -6, सडक/अर्जुनी तालुका -18, अर्जुनी/मोरगाव तालुका -28 आणि इतर – 12 असे एकूण 378 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.त्यापैकी 370 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व 8 रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.

ॲक्टिव्ह रुग्णांपैकी 98 रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका – 55, तिरोडा तालुका -05 ,गोरेगाव तालुका-00, आमगाव तालुका – 05, सालेकसा तालुका-02, देवरी तालुका – 00, सडक/अर्जुनी तालुका- 13, अर्जुनी/मोरगाव तालुका – 17 व इतर एक असे एकूण 98 रुग्ण ऍक्टिव्ह रूग्णांपैकी घरीच अलगिकरणात आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 15 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.यामध्ये गोंदिया तालुका-8,तिरोडा तालुका – 6 आणि एक रुग्ण सडक/अर्जुनी तालुक्यातील आहे.

गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 899 नमुने तर रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 273असे एकूण 1172 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.बाधित रूग्णांची संख्या 1165 झाली आहे. यामध्ये काही रुग्णांची चाचणी पुन्हा करण्यात आल्यामुळे पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या वाढली आहे.

कोरोनावर ज्या रूग्णांनी आज मात केली आहे अशा रुग्णांची संख्या 5 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -1, गोरेगाव तालुका -3 आणि आमगाव तालुका -1 असे एकूण पाच रुग्ण आहे.आतापर्यंत 772 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 14991 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 13404 नमुने निगेटिव्ह आले.तर 899 नमुने पॉझिटिव्ह आले आहे. 255 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 433 नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.

विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 58 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 893 व्यक्ती अशा एकूण 951 व्यक्ती विलगिकरणात आहेत.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत 9127 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये 8854 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.273 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 58 चमू आणि 46 सुपरवायझर 134 कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे.यामध्ये गोंदिया तालुका -18, आमगाव तालुका -20, सालेकसा तालुका -17,गोरेगाव तालुका -7, देवरी तालुका-8,सडक/अर्जुनी-13, तिरोडा तालुका-47 आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-4 असे एकूण 134 कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात आहे.