मुंबईतील सर्वात लहान 9 मिलीमीटर उंचीची श्रींची उभी मूर्ती

0
197

बाळू राऊत प्रतिनिधी
घाटकोपर : गणेश भक्तांना जवळून श्रीचे दर्शन घेता यावे यासाठी साकीनाका परेरावाडी येथील ओम श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाने यंदा मुंबईतील सर्वात लहान 9 मिलीमीटर उंचीची श्रींची उभी मूर्ती साकारली आहे. या मंडळाची स्थापना 1993 झालेली असून मुंबईचा महाराजाधिराज पेन्सिल च्या टोकावर मूर्ती बनवली आहे सर्वात लहान फक्त नऊ मिलिमीटर उंची आहे. तर ही मूर्ती पाहण्यासाठी सुष्म दुर्बीण मधून दर्शन घेता येणार आहे. हे मंडळ खूप चांगले उपक्रम राबवत असून या वर्षी कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता मंडळाने या वर्षी कोरोना बद्दल जनजागृती अभियान, विभागात मास्क, सॅनिटायजर, वाटप केले तसेच रक्तदान शिबीर घेतले, व्हिटॅमिन सि च्या गोळ्या वाटप, गाई च्या गोठ्यात चारा वाटप, आणि विशेष म्हणजे स्थानिक विभातील डॉक्टरांना पीपीई किट पण देण्यात आले आहे . हा उपक्रम राबविण्यात मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश उर्फ बंटी खानविलकर, खजिनदार रोहन जगताप, सेक्रेटरी दिनेश गोसावी व सर्व मंडळाचे कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली आहे.