आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेची जि.प.निवडणुकीची तयारी

0
198

 

दखल न्युज भारत:बिंबिसार शहारे

भंडारा दि.२६/०८/२०२०:
भंडारा -पवनी विधानसभा मतदार संघात जि.पं. पं.स. निवडणुकीत आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात शिवसेनेनी जि.प.च्या सर्व १७ जागा आणि पं.स.च्या३४ जागा लढण्याचा निर्धार केला आहे. याकरिता १७ जि.प.क्षेत्रांमध्ये निरीक्षक नियुक्त करण्यात आले.विश्राम गृह वाही,पवनी येथे पवनी तालुका शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली,आमदार जनसंपर्क कार्यालय,भंडारा येथे आज भंडारा तालुका बैठक घेण्यात आली. जि.प. निवडणुकीतील सर्व इच्छूक उमेदवारांविषयी जनमत चाचपणी,तसेच इतर पक्षांच्या तयारीचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या दमदार नेतृत्वात सर्व जागा काबीज करण्यासाठी व्यूव्हरचना तयार करण्यात आली. शिवसेना पक्ष संघटनेचे भंडारा व पवनी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.