रमाई आवास योजनेची शिल्लक रक्कम तात्काळ देण्यात यावी डॉ नेपाल रंगारी यांची मागणी

0
150

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

आज दिनांक 26 ऑगस्ट 2020 ला भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा भंडारा जिल्ह्याच्या वतीने डॉ नेपाल रंगारी अध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा भंडारा जिल्हा तथा सदस्य जिल्हा परिषद भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली मा.जिल्हाधिकारी भंडारा यांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या
(१)रमाई आवास योजनची शिल्लक रक्कम तात्काळ देण्यात यावी
(२) भंडारा जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांसाठी व शेतकर्‍यांना हेक्टरी २५००० रू अनुदान देण्यात यावे व भाजीपाला उत्पादक शेतकरी यांना ५०००० रू देण्यात यावे
(३) भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील बोद्रा येथील तलावाची पाळ फुटल्याने मच्छिमारांना१५००००० पंधरा लाख रू पर्यंत मदत करण्यात यावी व तलावाची पाळ पूर्ववत करण्यात यावी
(४) कोरोना काळातील वीज बिल माफ करावे
अशा अनेक मागण्यांचे निवेदन मा़. जिल्हाधिकारी भंडारा याचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री विश्वजीत कदम विधानसभा अध्यक्ष नानाभाऊ पटोले खासदार सुनिल मेंढे भंडारा गोंदिया विधानपरिषद सदस्य आमदार डॉ परिणय फुके यांना देण्यात आले
निवेदन सादर करतांना रोशना नारनवरे सभापती पंचायत समिती तुमसर सुनिल भोवते आनंदराव देशपांडे भारत नंदागववळी जोती रामटेके शैलेश मेश्राम अनिल मेश्राम नगरसेवक कैलास तांडेकर असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.