नागपुर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांची तडकाफडकी मुंबईत बदली

0
681

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : २६ आँगस्ट २०२०
नागपुर महानगरपालिका आयुक्त म्हणून आपली वेगळीच छाप सोडणाऱ्या आयुक्त तुकाराम मुंडे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव पदावर बदली सीताराम कुंटे अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी केली असुन त्यांच्या जागी राधाकृष्णन बी नवे नागपुर मनपा आयुक्त म्हणून जबाबदारी स्वीकारतील. कालच मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोना झाला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी अशा पद्धतीने त्यांची तडकाफडकी बदली झाल्याने आता नागपुर करांच्या रोषाला शासन व प्रशासनाला झेलावे लागेल. कारण तुकाराम मुंडे पासून जरी राजकारणी खुष नसले तरी जनता मात्र खुपच आनंदी होती हे मात्र नक्की.