म्हशी चोरणारे अट्टल चोरटे कामठी पोलिसांच्या ताब्यात नवीन कामठी गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

0
650

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

कामठी / नागपुर: २६ आँगस्ट २०२०
नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील गादा गावातील शिवारात कामठी येथील दाल ओली क्रमांक २ रहिवासी रोशन राधेश्याम यादव यांचे १२ एकर शेत आहे. शेतातच गुरांसाठी गोठा बनविला आहे. १५ ऑगस्ट रोजी अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत रोशन यादव यांच्या गोठ्यातील ३ म्हशी चोरून नेल्या. रोशन यादव यांनी दिलेल्या तक्रारी वरून नवीन पोलीस स्टेशन कामठी यांनी अपराध क्र 401/2020 कलम 379 अंतर्गत रीतसर तक्रार नोंदवून घेतली.
२४ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता नवीन कामठी पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथक पेट्रोलिंग वर असताना महालक्ष्मी ॲग्रो कंपनी महालगाव रोड येथे तीन संशयित व्यक्ती दिसून आले गाडी थांबताच सदर व्यक्तीने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिस पथकाने तत्परतेने त्यांना पकडून चौकशी केल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली नंतर बारकाईने चौकशी केल्यास त्यांनी गादा शिवारातून तीन म्हशी चोरून लीलाधर बोरकुटे मू चोवा पो अड्याळ त पवनी जि भंडारा येथील रहिवासी लीलाधर यांना विकल्याचे सांगितले पोलिसांनी 3 म्हशी व वाहून नेण्यासाठी उपयोगात आणलेली बोलेरो पिकप गाडी असा एकूण ६९,५००/- रुपयांच्या मुद्देमाल हस्तगत करून आरोपी १) सोनू उर्फ हितेंद्र नुपकुमार कंगाले (वय २०) २) रवी पंजाबराव मेश्राम( वय १९) दोन्ही राहणार कढोली ता. कामठी जि. नागपूर 3) अमित दामोदर सेलोटे (वय २०) रा .महालगाव ता कामठी जि. नागपूर तिघांना अटक करून 401/2020 कलम 379.34 भांदवि अंतर्गत गुन्हा नोंदवून गुन्ह्याच्या पुढील तपास सुरू केला आहे. सदर कार्यवाही परिमंडळ ५ चे सह पोलीस उपआयुक्त नागपूर शहर नीलोत्पल, सह पोलीस आयुक्त कामठी विभाग मुंडे,यांच्या मार्गदर्शनात नवीन कामठी पोलीस स्टेशनचे पो. नि. संतोष बाकल, आर आर पाल पो.नी.( गुन्हे) स पो नि कन्नाके, पो.ह पप्पू यादव, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, मंगेश यादव, सुधीर कोणाच्या, सुरेंद्र शेंडे, उपेंद्र आकोटकर आदींनी पार पाडली.