खळबळजनक घटना, महिनाभरापुर्वी काराग्रुहातुन बाहेर आलेल्या युवकाचा गळा चिरुन खुन,यवतमाळातील लोहारा येथिल घटना

0
275

 

यवतमाळ / परशुराम पोटे

शहरालगत असलेल्या लोहारा येथे भर रस्त्यावर युवकाचा गळा चिरुन खुन झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
देविदास निरंजन चव्हाण(२५)रा.उद्योग नगर लोहारा यवतमाळ असे म्रुतकाचे नाव आहे.देविदासवर भैया यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.याच गुन्ह्यात तो मागील दिड वर्षापासुन काराग्रुहात होता. महिनाभरापुर्विच त्याची सुटका झाली होती.विरोधी टोळीच्या सदस्यांनी देविदासचा खुन केल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे. आज बुधवारी दुपारी १:३० वाजताचे सुमारास देविदास दुचाकीने जात असतांना लोहारा मार्गावर त्याच्यावर हल्ला करुन त्याचा गळा चिरण्यात आला. गळ्यातुन मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे देविदासचा घटनास्थळीच म्रुत्यु झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले.यावेळी बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.