हर्षे साखरे दखल न्युज भारत
गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी नेहमीच नक्षल कार्यवाही करतात .या चळवळीला नष्ट करण्यासाठी पोलीस दलातर्फे विविध अभियान राबविण्यात येते. या पार्श्वभूमीवर
आज एटापल्ली तालुक्यातील पेंढरी जंगल परिसरात सी – ६० जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षल्यास कंठस्नान घालण्यात पोलीस जवानांना यश आले आहे.
पोलीस जवान आज २६ ऑगस्ट रोजी नक्षल विरोधी अभियान राबवित होते. दरम्यान दुपारी २ वाजताच्या सुमारास नक्षल्या सोबत चकमक उडाली. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षली पसार झाले. पोलिसांना घटनास्थळी एका नक्षल्याचा मृतदेह आढळून आला आहे.
त्यामुळे या परिसरात पोलीस अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे .