
अमरावती(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
जिल्ह्यातील चांदुररेल्वे पोलीस स्टेशन हद्दीतील विरुळ रोंघे येथे शासकीय तांदूळ खरेदी करतांना दोघांना पुरवठा निरीक्षकांनी रंगेहात पकडले
निलेश अंबादास काळे (गाडी चालक)व प्रमोद वामन देवघरे(मालक)अशी शासकीय तांदूळ खरेदी करणाऱ्या आरोपीचे नावे आहेत हे दोघेही बोलेरो पिकअप वाहन क्रं एम एच 27 बि एक्स 0156 या वाहनाद्वारे शासकीय तांदूळ खरेदी करीत असल्याची माहिती पुरवठा निरीक्षक स्मिता दळवी यांना मिळाली त्यांनी पथकासह विरुळ रोंघे येथे पोहचून घटनास्थळ गाठून तांदूळ खरेदी करताना दोघांना पकडले
या घटनेची माहिती चांदुररेल्वे पोलिसांना देण्यात आली चांदुररेल्वेचे ठाणेदार यांनी पोलिस कर्मचारी यांना पाठवुन बोलेरो पिकअप वाहन व वाहनात खरेदी केलेला 28,000रुपये किमतीचा 19.82 किंटल तांदूळ जप्त करुन ताब्यात घेतला स्मिता दळवी यांच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपीविरुध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियम कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे