झिमेला पोचमार्गाच्या नाल्यावरील पुल पूर्णपणे वाहून गेला. नवीन पुलाच्या प्रतीक्षेत झिमेलावासी

0
320

 

गुड्डीगुडम ग्रामीण प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:- अहेरी तालुक्यातील ग्राम पंचायत तिमरम अंतर्गत येणारा झिमेला गावाला जोडणारा एकमेव मुख्य रस्ता आहे.या रस्त्यावरील नाल्यावरील पुलाचे बांधकाम होऊन 35-40 वर्षांपूर्वी झालेला आहे. हा पुल पूर्णपणे जीर्णावस्थेत असून गेल्या 15 दिवस सतत मुसळधार पावसामुळे या नाल्यावरील पुल पूर्णपणे वाहून गेला आहे.झिमेलावासीयांना काही कामानिमित्त तालुका किंवा अन्य ठिकाणी जाणे-येणे करण्यास अडचणीचे जात आहे आणि कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.मुख्य मार्गावरील पुल वाहून गेल्यामुळे आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी जणूकाही कसरतच करावी लागेल.या झिमेला गावातील नागरिक, विध्यार्थी, शेतकरी, आरोग्य कर्मचारी,रुग्ण यांना होणाऱ्या अडचणींचा विचार करून शासनाने या नाल्यावर नवीन पुल बांधकाम करावी.आणि तात्काळ संबंधित विभागाने या समस्येकडे लक्ष देऊन पुल दुरुस्ती करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष गणपूरवार ,सुरेश पोरतेट, तिरुपती सडमेक, विनोद तोर्रेम, भगवान सिडाम, धर्मराज पोरतेट, अशोक आत्राम,बापु सिडाम, शंकर गावडे, दिलीप आत्राम यांनी केली आहे.