सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत झारेगुडावासियांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

0
126

उपसंपादक/ अशोक खंडारे
भामरागड तालुक्यातील इंद्रावती व पामुलगौतम नद्यांच्या कुशीत वसलेल्या झारेगुडा
गावांतील नागरिकांचे महापूरामुळे फार मोठे नुकसान झाले त्यांना जगण्यासाठी मदत व्हावी या उदात्त हेतूने केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ३७ व्या बटालियनचे कमांडंट श्रीराम मीना यांच्या आदेशानुसार २४ आॅगष्ट २०२० ला सिविक एक्शन कार्यक्रमांतर्गत झारेगुडा गावांतील नागरिकांना साडी,ब्लॉंकेट,स्वंयपाकाचे साहित्य (ताट,वाटी,जग,प्लेट,चम्मच,ग्लास,परात)इत्यादी साहित्यांचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी केंद्रीय राखीव पोलीस दल एफ/३७ चे निरीक्षक प्रविंद्र प्रसाद, भामरागड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक गजानन पडळकर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर झोल,भामरागडच्या नगराध्यक्षा संगिता गाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.