राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी २९ आँगस्ट रोजी भाजप तर्फे ” घंटानाद आंदोलन “

0
164

 

सुनील उत्तमराव साळवे (९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : २६ आँगस्ट २०२०
लाँक डाऊन च्या पार्श्वभूमीवर दारुची दुकाने उघडी केली परंतु मंदिर उघडण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र नकार दिला. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी चे नेते मा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ३१ आँगस्ट २०२० ला एक लाख वारकऱ्यासह पंढरपूर मंदिर येथे प्रवेश आंदोलन करण्याचे सरकारला आवाहन केले. त्याच बरोबर आता मंदिरे उघडण्यासाठी भाजपा ही आता आक्रामक होतांना दिसते.
राज्यातील हजारो मंदिरे ही कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासन व प्रशासनाने बंद केली आहे. ती मंदिर सुरु करा या मागणीसाठी विविध धार्मिक संघटना, धर्माचार्य, आणि प्रमुख देवस्थाने एकत्र येऊन दि. २९ आँगस्ट २०२० रोजी सकाळी १० वाजेपासून ठाकरे सरकारला ईशारा देण्यासाठी ‘घंटानाद आंदोलन “करणार अशी माहिती राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा भाजपा चे राज्य महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल न्यूज भारत ला दिली.
भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडी च्या नेत्रृत्वाखाली संपूर्ण राज्यात

घंटानाद आंदोलन ” सुरु करण्यात येईल जोपर्यंत राज्यातील मंदिरे उघडत नाहीत. भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते व राज्यातील भाविक जनतेला व सर्व राजकीय पक्षाला या आंदोलनात सहभागी होण्याचे भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवाहन केले आहे.