दखलच्या बातमीचा परिणाम गावप्रशासक सज्ज, तर मुंडीकोटा कंटेन्मेंट झोन मधील व्यापारी बचावले दण्डापासून, मंगळवार पासून दुकाने होणार सुरू ही ठरली अफवा

0
173

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : व्यापारी हिताचे दृष्टीने मुंडीकोटा येथील गाव गटाचे राजकारणी अतिशय विश्वासाने मुंडीकोटा हे कंटेन्मेंट झोन उठणार असे सांगत फिरत होते . यानुसार यांचे राजकारणी भाऊ ह्यांनी उपविभागीय अधिकारी यांचेसी बोलणी केली. त्यांनी माझे आदेश मला काढता येणार नाही. त्यासाठी वरिष्ठांचे आदेशाशिवाय पर्याय नसल्याचे भाऊंना सांगीतल्यावरून त्यांनी आपत्ती व्यस्थापन प्राधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचेशी चर्चा केली. या चर्चेवरून मुंडीकोटा हे कंटेन्मेंट झोन मुदतीपूर्वी मंगळवार पासून सुरू होणार असे स्थानिक राजकारणी गटाने व्यापारी वर्गात पसरविले होते. भाऊंची चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी पत्र पाठविले. रविवार असल्याने ते पत्र सोमवारी तिरोडा एसडीओ यांना मिळताच मंगळवार पासून व्यापारी प्रतिष्ठान सुरू होणार अश्या चर्चेला चांगलीच रंगत पाहावयाला मिळत होते.
पण सदर वृत्त दखलने मुंडीकोटा कंटेन्मेंट झोन उठणार मंगळवारला या शीर्षकाखाली प्रकाशित करून गावप्रशासनास व दुकानदारांना सतर्कतेच इशारा दिला होता. नियमांचे उल्लंघन करून दुकाने उघडली असती तर दण्डाची कार्यवाहिस सामोरे जावे लागले असते.

परिणामी सर्व व्यापाऱ्यांनी सावध पवित्रा घेत मंगळवारला मुदत पूर्व कंटेन्मेंट आदेशाची वाट पाहिली. व्यापारी प्रतिष्ठानांनी दुकाने उघडण्याचा आतातायीपणा केला नाही. नियमांचे उल्लंघन झाले नाही. आदेशाची वाट न बघता व्यापाऱ्यांनी दुकान सुरू केले असते तर दंडाचे कार्यवाहिस सामोरे जावे लागले असते. आता मात्र *सौ का बका, एक का लिखा,* या उक्तीचा मनमुराद चर्वण करीत, दण्डापासून बचावलो. असा आशेचा सुस्कारा टाकला आहे.

गाव आपत्ती व्यस्थापन प्रतिनिधी तथा तलाठी एम.टी.मलेवार यांनी सर्व व्यापारी दुकानदार नियमांचे उल्लंघन न करता कंटेन्मेंट झोनच्या नियमांचे पालन करीत असल्याबद्दल कौतुक करून आभार व्यक्त केले.

प्रतिक्रिया :मुंडीकोटा कंटेन्मेंट आज मंगळवारला उठणार या विषयी आपणांस वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसल्याने पुढील आदेशापर्यंत मुंडीकोटा हे कंटेन्मेंट झोन राहील. कोविड प्रादुर्भाव रोखथांब करण्यासाठी सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे.
तिरोडा तहसीलदार – प्रशांत घोरुडे