लाठी येथे रक्तदान शिबिरात असंख्य युवकांनी केले रक्तदान

0
122

 

वणी : परशुराम पोटे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताची कमतरता लक्षात घेता राष्ट्रहीताच्या दृष्टीने युवा बाल गणेश मंडळ लाठी तर्फे दिनांक २५ ऑगष्ट् ला सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत शासकीय रक्तपेढी चंद्रपूर च्या साहाय्याने रक्तदान शिबिर लाठी येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे आयोजन लाठी येथील युवक राहुल खारकर, प्रभाकर वाघाडे, प्रमोद खिरटकर, निलेश करडे, ज्ञानेश्वर गोवरदिपे यांनी केले होते.या शिबीराकरीता चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीतून संजय गावीत समाजसेवा अधिक्षक,
जयसिंग डोंगरे प्रयोगशाळा तंत्रन्य, वर्षा सोनटक्के प्रयोगशाळा तंत्रन्य,अपर्णा रामटेके प्रयोगशाळा तंत्रन्य, लक्ष्मण नगराळे परिचर,रुपेश घुमे इत्यादी आले होते.यात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला सहभाग नोंदवला कोरोनामुळे चंद्रपूर येथील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा पुरवठा कमी झाल्याचे लक्षात येता ही सदर रक्तपेढी सशक्त व्हावी या उद्धात हेतूने रक्तदान करण्यात आले. या रक्तदान शिबिरात अनेक गावातील तथा परिसराती गावातील युवकांनी रक्तदान केले ज्यामध्ये धर्मा डोहे, रमेश खिरटकर,रितेशभाऊ लाडे,धीरज भोयर,राहुल परचाके,प्रमोद खुरसाने,राकेश वराटे, मनोज आंबाडे,दीपक नरवडे,आशिष माहुरे,मंगेश मोते,सचिन खिरटकर,गणेश माहुरे,गणेश आंबडे,दीपक मोते, सचिन सातपुते,दिलीप खोके,संदीप राजूरकर,सुभाष मोते,आशिष खारकर,प्रेमा किटे,प्रफुल उपरे, प्रवीण मोते,आशिष घोरुडे,विजय गोवारदिपे अशा असंख्य युवकांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिर यशस्वितेकरिता लोकेश खोके,अजय गोवारदीपे, मुकेश खिरटकर,प्रकाश चार्लीकर,मंगेश खोके, निखिल तोडासे,कपिल खोके यासह गावकऱ्यांनी
योगदान दिले.