कोरोणाची दहशत योग्य आहे काय? आणि या दहशती अंतर्गत नागरिकांना बरबाद करणे न्यायसंगत आहे काय? –एमडी असलेले डॉ.तरुण कोठारी दिल्ली,डॉ.विश्वरुप राय चौधरी कोलकाता,डाॅ.के.के.अग्रवाल दिल्ली,यांच्या म्हणण्यानुसार कोरणा म्हणजे नाॅरमल बिमारी..सदर डाॅक्टरांचे आवाहन देशातील शासन-प्रशासन केव्हा स्विकारेल? — डाॅक्टरांच्या मते,”जगात,शिक्षण संस्था सह सर्व व्यापार व व्यवहार सुरळीत चालू…

0
435

संपादकीय
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
(सविस्तर वाचा)
“भारत देशातील नागरिकांत,कोरोणा या आजारांतंर्गत,”सत्तापक्षांकडून, अक्षरशः दहशती सारखी भिती निर्माण करण्यात आली.ही भिती एवढी जहाल होती की,”मनापासून मानसांना दुर लोटल्या गेले,”मानसापासून रोजगाराला दुर करण्यात आले,”घरापासून मुकण्यास मनुष्यमात्रांवर बडगा उगारण्यात आला, “मानुष्यमात्राच्या मुलभूत अधिकार व हक्कांना नाकारण्यात आले,”पायदळ प्रवाश करणाऱ्या प्रवाशांना अन्नपाण्याविणा तडफडू तडफडू मारण्यास,”नियोजनशून्य,व तितकिच बेजबाबदार पणाची बेकायदेशीर कृती करण्यात आली,याचबरोबर प्रवास करणाऱ्या देशातील नागरिकांना बदडून काढण्यात आले,हा प्रकार दहशतवाद्यांन पेक्षाही महाभयंकर असा असल्याचे चित्र अख्या भारतातील नागरिकांनी अनुभवले.म्हणजेच देशातील गोरगरीब नागरिकांसह सर्व नागरिकांचे दैनंदिन जीवन हतबल,बेसहारा,लाचार,मानसिक विकलांग,करण्यात आले.यामुळे सहाजिकच प्रश्न पडतो आहे,”कोरोणा,आजाराच्या आड देशातील नागरिकांना बरबाद करणे न्यायसंगत आहे काय? आणि कोरणा आजाराची नागरिकांत निर्माण करण्यात आलेली दहशत योग्य आहे काय?
दिल्ली येथील डॉ.तरुण कोठारी,डॉ.के.के.अग्रवाल व कोलकाता येथील डॉ.विश्वरुप राय चौधरी,यांनी युट्युब व्हिडिओ द्वारा,”कोरोणा,बाबत आपले मते परखडपणे मांडली व हा आजार नारमल असल्याचे मुद्देसुद सविस्तर स्पष्ट केले.या आजाराने एका वर्षामागे,केवळ झिरो पाईन्ट ३ नागरिक मरत असल्याचे सांगितले.अर्थात एक हजारामागे मृत्यूचा दर ७ असल्याचे सुध्दा अवगत केले.म्हणजेच एका वर्षामागे,”देशात, १५ ते २५ हजारांपर्यंत कोरोणा बाधीत विविध कारणांमुळे मरत असल्याचे आकडेवारीवरून खुलासा केलाय.
परत या डॉक्टरांचे असे मत आहे की,१)टिबी,२)डायबिटीस,३)कॅन्सर व इतर आजाराने दर वर्षाला ८१ लाख नागरिकांचा मृत्यु होत असल्याचे लक्षात आणून दिले.सदर आजाराच्या मृत्यू दरापेक्षा,”कोरोणा,आजारांचा मृत्यू दर हा नगन्य असल्याची स्थिती आकलनाद्वारे निदर्शनास आणून दिले.
तद्वतच मनुष्य मात्राप्रमाणेच,जनावरांचे स्वॅब घेतले तरी कोराना पॅजेटीव्ह निघतात,असेही डाॅक्टर विश्र्वरूप राय चौधरी यांचे मत आहे.कोरोणा मृत्यूचा आकडा जाहीर करताना,टिबी,डायबिटीस,कॅन्सर व इतर आजारांचा उल्लेख केला जात नाही किंवा या आजारांचा मृत्यू दर गायबच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.तरुण कोठारी यांनी तर केंद्र सरकार,देशातील राज्य सरकारे,देशातील कॅबिनेट सचिव,सचिव, डॉक्टर,इंजिनिअर,जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक,आणि सर्व प्रकारचे अधिकारी यांना,”कोरोणा,आजार भयंकर जहाल,महाभयंकर संसर्गजन्य,असल्याचे शिध्द करून दाखविण्या सबंधात खुले आव्हान दिले.याचबरोबर शिध्द करून दाखविल्यास १ लाख रुपये बक्षीस देण्याचे सार्वजनिक केले.मात्र डॉ.तरुण कोठारींचे आव्हान आतापर्यंत शासन-प्रशासन,स्तरावर स्विकारण्यात आले नाही.
परत डॉ.तरुण कोठारी व डॉ.विश्वरुप राय चौधरी,यांनी तर,”कोरोणा,बाधितांवर ज्या ४ प्रकारच्या औषधांद्वारे उपचार केल्या जातो,”त्या, ४ प्रकारच्या औषधांच्या उपचारांमुळेच,”कोरोणा बाधितांचा मृत्यू होतो,हे सुद्धा मुद्देसुद स्पष्ट केले.असे असेल तर,”देशातील नागरिकांना त्यांच्या सर्व प्रकारच्या अधिकार हक्कापासून वंचित करण्याचा,हा देशांतर्गत महाभयंकर छडयंत्राचा भाग आहे असे गृहीत धरायचे काय?हा प्रश्न गंभीरता निर्माण करतो आहे.
एवढेच काय तर,डॉ.विश्वरुप राय चौधरी एक पाऊल पुढे जात,”डब्लु.एच.ओ.चा,अहवाला देवून म्हणतात,”ज्या,औषधांवर जगात बंदी आणली जाते,”ते, औषधे भारत देशात,”उपचारार्थ,उपयोगात आणली जातात.डाॅ.विश्वरुप राय चौधरी,यांचे हे म्हणणे ऐकून तर मन शुन्य होते.मग हा मुद्दा उपस्थित होतो की,भारत देशातील नागरिकांवर अयोग्य पद्धतीने उपचार करणारी यंत्रणा,”देशात,कोणाच्या आशिर्वादाने सुरू आहे? व अयोग्य औषधोपचाराने देशातील नागरिकांना जर्जर केले जाते काय?या बाबत आता शंका येवू लागली आहे..
डॉ.विश्वरुप राय चौधरी म्हणतात,”कोरोणा,वायरल हा नेहमी रंग बदलतो,यामुळे या आजारांवर कायमस्वरूपी औषध व लस उपलब्ध करु शकत नाही.
सुर्य प्रकाश व खुले वातावरण,हे कोरोणा बाधीतांना,कोरोणा आजारातून मुक्त करण्यास महत्त्वपूर्ण ठरतात.याचबरोबर सी जिवनसत्वे सुध्दा कोराणा आजारातून मुक्त करण्यासाठी उपयुक्त आहेत.असे असताना कोरोणा आजाराची भिती दाखवून,”प्रवाश करणाऱ्या नागरिकांना क्वाॅरंटाईन का म्हणून केली जातात? हा प्रश्न शासन-प्रशासनाची,बरबर्ता उजागर करतो आहे,असे समजायचे काय?
डॉ.विश्वरुप राय चौधरी यांच्या मते,क्वाॅरंटाईन केलेल्या नागरिकांना बंदिस्त करून ठेवले जाते,यामुळे त्यांना सुर्यप्रकाश मिळत नाही,नैसर्गिक खुल्या वातावरणाचा त्यांना फायदा होत नाही,जेवनाच्या माध्यमातून आवश्यक असलेली सी जिवनसत्वे मिळतील असे जेवन क्वाॅरंटाईन नागरिकांना दिले जात नाही… आणि हा आजार लागवड नाही,उलट क्वाॅरंटाईन करुन ठेवलेल्या नागरिकांना,”कोरोणा,होण्याचा जास्त संभव असतो..,”मग प्रवाशी नागरिकांना क्वाॅरंटाईन का म्हणून केल्या जातो? देशातील नागरिकांना याचे उत्तर केंद्र व राज्य सरकारे यांनी देणे अभिप्रेत आहे.
परत जागतिक आरोग्य संघटना म्हणतय की,”शोशल डिस्टींग मुळे रुग्ण वाचू शकत नाही,”तर,शोशल डिस्टींगचे नाटक भारत देशात कशाला सुरू आहे?
डॉ.विश्वरुप राय चौधरी,यांच्या माहिती नुसार,”जगातील,सर्व शाळा व काॅलेज सुरू आहेत,सर्व व्यापार केंद्रे व या व्यापार केंद्रातंरृगत व्यवहार सुरळीत चालू आहेत.मग जगातील नागरिकांना,तेथील शासन-प्रशासनाला,”कोरोणा आजाराची,”भिती नसेल,तर भारत देशात संचारबंदी का? देशात आवागमन साठी बंदी का? ई-पासचे बंधने कशासाठी? देशातील शाळा व काॅलेज बंद का? व संचारबंदी चे नेमकी कारणे काय?या संबंधाने भारत देशातील शासन-प्रशासनाच्या ध्येय-धोरणाची,निर्णयांची,निर्णयानुसार अंमलबजावणीची,जागतिक पातळीवरुन चौकशी होणे आवश्यक असल्याचे,सदर डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार दिसते आहे.