आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये कोरोना बाधित पती पत्नीवर झाला गुन्हा नोंद

पती पत्नीने मुंबई वरून आल्याची प्रशासनाला माहिती न देता लपवून ठेऊन 14 दिवस विलीगिकरनाचा केला उल्लंघन महिलेची रिपोर्ट पॉझिटिव्ह

0
663

 

हर्ष साखरे ता प्रतिनिधी आरमोरी

आरमोरी :-
आज संपूर्ण भारतामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे या कोविड 19 ला रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत आहे. या कोरोना व्हायरसच्या काळात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कलम १४४ व लॉकडाऊन घोषित करून अनावश्यक वाहतूकीवर तसेच आंतरजिल्हा वाहतूकीवर बंदी घालण्यात आली. तसेच बाहेर जिल्ह्यातून, बाहेर राज्यातून आलेल्या नागरीकांना १४ दिवस विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. असे असतानाही मुंबईहून आलेल्या महिलेले माहिती लपवून ठेवल्याच्या कारणावरून पती – पत्नीवर आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामभाऊ देवाजी हेडाऊ आणि त्यांची पत्नी मंदा रामभाऊ हेडाऊ यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे.
४ ऑगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता आरमोरी नगर परिषदेत भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाली. मंदा रामभाऊ हेडाऊ रा. आरमोरी ही बदलापूर मुुंबई येथून आल्याची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच लिपीक मोहन भाऊजी कांबळे, ज्ञानेश्वर महादेव दुमाने, सुनिल भानुजी कांबळे यांनी हेडाऊ यांच्या घरी भेट दिली. यावेळी ते आपल्या घरी असलेल्या उपहारगृहात बसले होते. त्यांच्या त्यांच्या पत्नीबाबत विचारणा केली असता ती २ ऑगस्ट रोजी बदलापूर येथून आली असून घरीच असल्याचे सांगितले. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पत्नीची व कुटुंबीयांची आरोग्य तपासणी करावयाची असून कोणत्याही व्यक्तीने घराबाहेर पडू नये, अशी सुचना केली. उपहारगृह बंद करण्यात यावे व कोणत्याही साहित्याची, पदार्थाची देवाण – घेवाण करू नये, अशा सुचना दिल्या. यावेळी मंदा हेडाऊ यांना वाहनात बसवून बसस्थानकावरील आरोग्य तपासणी केंद्रावर नेण्यात आले. आरोग्य तपासणी व नोंदणी करून त्यांना शासकीय मुलींचे वसतीगृहात नेण्यात आले. यानंतर त्यांचे नमुने घेतले असता त्यांना कोविड – १९ ची बाधा असल्याचे निष्पन्न झाले.
मंदा हेडाऊ यांनी रेड झोनमधून येवूनही प्रशासनापासून माहिती लपविली. तसेच त्यांच्या पतीने जाणीवपूर्वक ही बाब लपविली. यामुळे त्यांच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना १४ दिवस गृह विलगीकरण करण्यात आले आहे. तसेच नागरीकांचे आरोग्य धोक्यात आणल्याप्रकरणी रामभाऊ हेडाऊ आणि मंदा हेडाऊ यांच्यावर साथरोग अधिनियम १८९७ चे कलम २, ३, ४ आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६० भादंवि १८६० चे कलम १८८, २७१, कलम ३७ (३) चे उल्लंघन केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर पाणीपुरवठा अभियंता नितीन गौरखेडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.