अबब ….आठ फुट लांबीचा अजगर(सर्पमीत्राच्या मदतीने पकडून दिले जिवनदान)

0
174

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
तालूक्यातील जांभूळखेडा येथील शेतकरी माजी उपसरपंच देवानंद लोहबंरे यांचा शेतात आज मंगळवार रोजी आठ फूट लांबीचा अजगर साप आढळून आला, त्याला सर्पमित्रांचा मदतीने पकडण्यात आले व सूरक्षित स्थळी जगंलात सोडत जीवनदान देण्यात आले.
गावालगत असलेल्या लोहबंरे यांचा शेतात मजूर शेताचे काम करीत असताना अचानक त्यांना आठ फूट लांबी असलेला अजगर साप दिसून आल्याने उपस्थीतांची घाबरगूंडी उडाली मात्र यावेळी त्याला काहीच ईजा न करता प्रसंगावधान राखत शेतमालक लोहबंरे यानी लगेच कूरखेडा येथील सर्पमित्र रोषन मेश्राम व विनोद मेश्राम याना भ्रमनध्वनी वर माहीती दिली लगेच ते घटणास्थळी पोहचत अजगराला जेरबंद केले व त्याला वनविभागाचा स्वाधीन केले. वनविभागाचा कर्मचार्यानी त्याला सूरक्षित पणे त्याचा अधिवास असलेल्या जवळच्या जगंलात सोडत जीवनदान दिला.