कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कोंबडीच्या अंड्यातून कृत्रिम पद्धतीने उबवणी करून चक्क पिलांना दिला जन्म

0
503

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: वणीचा संकेत डवरे हा युवक यवतमाळ येथील मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेतोय त्याने चक्क कोंबडीच्या पिलांना जन्म दिला आहेत.

संकेतला कृषी क्षेत्रातील शिक्षणामुळे या विषयाचे सखोल ज्ञान होतेच त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन स्वतःच्या घरामध्ये या अंड्याला कृत्रिम रित्या ऊब दिली तसेच अंड्यातून होणारी हालचाल लक्षात यावी म्हणून निगराणीत ठेवले . उबवणुकीच्या काळात पाचव्या ते सातव्या दिवशी आणि १४ ते १८व्या दिवशी खराब, जुनी, अफलित अंडी ओळखून इनक्युबेटरमधून काढून टाकालीत यंत्रामध्ये स्वच्छ, ताज्या हवेचा पुरवठा केला जात होता अंडय़ातून बाहेर पडणारा कार्बन डायॉक्साइड वायू बाहेर टाकण्यासाठी यंत्राच्या वरच्या भागात छिद्र केले होते. अंडय़ातील बलक आतील पापुद्रय़ाला चिकटून वाढत्या गर्भाला इजा होऊ नये, म्हणून अंडी दिवसातून तीन-चार वेळा हलवली जात होती. ऊब देण्यासाठी साधारणत: १०१-१०२ अंश फॅरेनहाइट तापमान नियंत्रित केले होते कमी तापमान असल्यास पिल्ले ओलसर होऊन उशिरा जन्मतात. उष्णता जास्त असल्यास पिल्ले लवकर जन्मतात यंत्रात सर्व खबरदारी विद्यार्थ्याने वेळोवेळी घेऊन हे प्रात्यक्षिक अतिशय काटेकोरपणे यशस्वी केले.
व कोंबडीच्या पिल्लांना जन्म दिला सदर संपूर्ण प्रात्यक्षिकात महाविद्यालयीन प्राचार्य डॉ आर ए ठाकरे व उपप्राचार्य एम व्ही कडू प्राध्यापिका स्नेहल लोखंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.