कृषिदूता कडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
94

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापिठ, अकोला संलग्नित श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा अमरावती येथील अंतिम वर्षाच्या ग्रामीण कृषि कार्यनुभव व ए.आय.ए. या सातव्या सत्रातील विद्यार्थी, गेल्या एक महिन्यापासून कृषि क्षेत्रातील प्रात्यक्षिक शिक्षण घेत आहेत. या सोबतच हे विद्यार्थी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात कृषिदुत म्हणुन शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थी कृषिदुत ऋषिकेश मुकुंदराव अकोटकार व मयूर डोंगरे यांनी परिसरातील शेतकरी अभिजीत नवले यांच्या शेतात फुलझाडे लागवडीची शास्त्रीय पद्धत त्यांचे प्रात्यक्षिक केले व याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमावेळी शेतकरी अभिजीत नवले, सुरेश इंगले, संतोष भारसकडे, एकनाथ नवले आणि गावातील इतर शेतकरी मंडळी उपस्थित होती.