शिवसेनेतर्फे नगरपालिका कोविड योद्धांचा सत्तकार

0
99

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

शिवसेना पक्षप्रमुख मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाशी लढण्याचा कोरोना नष्ट करण्याचा विडा उचलला आहे.त्यांच्या या कामात सहकार्य करणाऱ्या कोविड योध्दाचा सन्मान पत्र देऊन शिवसेनेच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.त्यामध्ये आज अकोट नगरपालिका कार्यालयात शिवसेनेच्या वतीने अकोट शहरात कोरोना प्रार्दुभाव परिस्थितीत आपल्या जिवाची तमा न बाळगता व स्वतःची कोणतीही पर्वा न करता आपल्या सेवाभावी समाजसेवी वृत्तीचे दर्शन घडवत ज्यांनी आपल्या कार्यातून अखंड अविरत समाजोपयोगी सेवा दिली अश्या लोकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी शिवसेनेच्या अकोला जिल्हा महिला शिवसेना आघाडी जिल्हा संघटिका मायाताई म्हैसने,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटिका उषाताई गिरनाळे,शिवसेना नगरसेवक गटनेते मनीष कराळे,महिला आघाडीच्या वर्षाताई भगत,वर्षाताई करुले आदी यावेळी उपस्थित होते.