त्या अल्पवयीन मुलीला बाल न्यायालयात हजर करण्यासाठी व आरोग्य तपासणीसाठी गडचिरोलीला हलवले

0
319

 

कोरची ःदि 26 अगस्ट-
येथील आदिवासी अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादलेल्या गुन्हाचा तपास सुरू केला असून आज पोलीसांनी मुलीला बाल न्यायालयात हजर करण्यासाठी व आरोग्य तपासणी करण्यासाठी गडचिरोलीला हलवले आहे.
अल्पवयीन आदिवासी मुलीवर मात्रुत्व लादणारा बाप कोण या मथळ्याखाली व्रूत प्रकाशित झाले होते.खडबडून जागे झालेल्या पोलीसांनी व्रूतपत्राच्या आधारे तपास करून अज्ञात आरोपीच्या विरोधात भादवी ३७६ (२)(जे ) सह पोस्को कलम ४ अंतर्गत कोरची पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात आरोपीकडून पिडीत अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या आईवडिलांवर प्रचंड दबाव असल्यामुळे पोलीसांनी शासनाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल यांनी फिर्याद नोंदविली आहे. फिर्यादिवरून कोरची पोलीस स्टेशनमध्ये पोलीसांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात टाळाटाळ करीत असल्याने आणि पोलीसांवर प्रसिद्धी माध्यमाने प्रकरण उचलून धरल्या असल्यामुळे गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून आज तीन लोकांचे बयान नोंदवीले आहे चार दिवसांत खऱ्या आरोपी पर्यंत पोहचू असे तपास अधिकारी महेश कोंडूभैरी यांनी दिली असली तरी मागील मार्च महिन्यात कोरचीत अशाच एका आदिवासी मुलीवर ग्रामसेवकाने अत्याचार केल्याची घटना घडली होती. मुलीच्या आईने आणि मुलीने पोलीसात तक्रार सुद्धा दिली होती. पण काही सुज्ञ समाजसेवकांनी मुलीला आणि आईला समजावून पिडीतेला न्याय देण्याऐवजी प्रकरणावर पांघरून घातले.