खाजगी प्रवासी वाहतूक व्यावसायीकाना ई पास ची अट रद्द करा अन्यथा आंदोलनाचा इशारा

0
177

कूरखेडा/राकेश चव्हान प्र
राज्यात मागील पाच महिण्यापासून लाकडाऊन व जिल्हाबाहेर प्रवासाकरीता ई- पास चा सक्तीमूळे खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसाय संकटात आलेला आहे व वाहन चालक मालकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे हा व्यवसाय पूर्ववत होण्याकरीता ई पास ची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी तालुका जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वतीने स्थानिय तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कडे करण्यात आली आहे.
शाशनाने नूकतीच एस टी महामंडळाचा बसेसना जिल्हा बाहेर वाहतूकीची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र खाजगी प्रवासी वाहतूक वाहनाना ई पासची सक्ती करण्यात येत असल्याने शाशनाचा या निर्णयाविरोधात तिव्र रोष निर्माण झाला आहे व वाहन चालक मालक व त्यांचा कूटूंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे शाशनाने याची दखल घेत आपला निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्यथा राज्य संघटनेचा वतीने ठिकठिकाणी दि १ सप्टेबंर रोजी एस टी बस रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सूद्धा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत गावळ, सचिव जावेद शेख व सदस्य उपस्थित होते.