लाखनी तालुक्यातील रेंगेपार/कोठा या गावात अतिवृष्टी बाधीत झालेल्या पूरग्रस्त गरिबकुटूंबाची व शेतकऱ्यांची माजी राज्यमंत्री आ.डॉ.परिणय दादा फूके यांनी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून केली मदत .

0
132

 

प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोटा या गावी नागरिकांच्या घरात पाणी घुसून घरांची पडझड झाली होती. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झाले होते व गावकऱ्यांना खाण्याचे सुध्दा प्रश्न निर्माण झालेले होते त्यामुळे त्यांचा शेतीचे व पडीत झालेल्या घराची पाहणी करून माजी राज्यमंत्री आमदार डॉ.परिणय दादा फूके यांनी प्रत्येक क्षतिग्रस्त झालेल्या कुटुंबाकडे जाऊन त्यांच्या समस्या सोडवण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. दादांच्या कार्य शैलीचा परिचय देत कार्यकर्त्यांनी सुद्धा तितक्याच उत्स्फूर्तपणे गरीब कुटूंबियांची आत्मीयतेने विचारपूस करून ४० ते ५० बाधित झालेल्या कुटूंबियांना तांदूळ वाटप करून त्यांच्या चुलीचा प्रश्न सोडविला.
या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष धनंजयजी घाटबांधे,भाजयुमो भंडारा जिल्हा महामंत्री शेषरावजी वंजारी, तालुका महामंत्री सत्यवानजी वंजारी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संदीपभाऊ भांडारकर, अनु. जमाती जिल्हा महामंत्री इंजि.मंगेशभाऊ मेश्राम,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष देवेशभाऊ नवखरे, शरद इटवले, सरपंच वैशालीताई खोब्रागडे, उपसरपंच दीपकभाऊ काटगाये, व गावकरी उपस्थित होते..!