इंदिरा सह.सुतगिरणीतील साहीत्य चोरणार्या ९ आरोपीतांसह ११ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त, डि.बी. पथकाची कारवाई

0
341

 

वणी : परशुराम पोटे

इंदिरा सह.सुतगिरणीतील साहित्य चोरणार्या ९ जनांना डि.बी.पथकाने अटक केली आहे.
वणी- मुकुटबन मार्गावर असलेल्या इंदिरा सह.सुतगिरणीत दि.७ आँगष्ट्चे सायंकाळी ५ वाजताचे दरम्यान ते ९ आँगष्ट्चे १०:३० वाजताच्या सुमारास कोनीतरी अद्ण्यात चोरट्याने जुने टिनपत्रे,प्लास्टीक खुर्च्या व ईतर साहित्य अं.किं.७ हजार पाचशे व लोखंडी गज व अँगल अं.७०० किलो अं.किं.३५ हजार असा एकुन ५२ हजार रुपयेचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार सुतगिरणीचे सुपर वाईजर प्रफुल शामराव उपरे यांनी वणी पोलीसात केली. या रिपोर्ट वरुन पोलीसांनी कलम ३७९ भादंवी नुसार गुन्हा नोंद करुन तपासात घेतला. दि.२१ आँगष्ट् रोजी केसुर्ली जंगल शिवारातुन वाहन क्र.एमएच ३४ एव्ही ०३१५ मध्ये लोखंडी गज व अँगल अं.७०० कि.अं.किं.३५ हजार जप्त करण्यात आले होते. तसेच आज दि.२५ आँगष्ट्ला आरोपी प्रशांत संजय बेसरकर, राजु मधुकर झिलपे,सत्यम शैलेंद्र शेलार,रिजवान शाह जिगर शाह,शेख शाहरुख शेख सलिम(२१)रा.खरबडा वणी,शेख जावेद शेख सलिम(२४)खरबडा वणी,शंकर भिमराव दारुंडे(१९)खरबडा,मो.रिजवान मो.हनिफ(२५)पंचशिलनगर वणी, शाम वासुदेव चोखारे(२९)पंचशिल नगर यांचे कडुन ४ नग ३० फुटी टिनपत्रे किं.अं.४ हजार,१५ नग प्लाँस्टीक खुर्च्या,जुनी गँस शेगडी असा एकुन ११ हजार व गुन्ह्यात वापरण्यात आणलेली महिन्द्रा बोलेरो पिकअप वाहन क्र.एमएच ३४ बिजी २८८४ किं.अं.७ लाख असा एकुन ११ लाख ४० हजार शंभर रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकिस आणला.
सदर आरोपीतांना मा. न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय वणी यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने यवतमाळ जिल्हा काराग्रुहात पाठविण्याचे आदेश दिले.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली डि.बी. प्रमुख पोउनि/ गोपाल जाधव, पथकाचे पोना/सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, रत्नपाल मोहाडे,हरिंद्र भारती, पंकज उंबरकर, अमित पोयाम, यांनी केली.