खंडणीबहाद्दूर गजानन कुळकर्णी व नितीन मोहरे यांची मनसेतून हकालपट्टी.

0
117

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे )

मनसेच्या विद्यार्थी सेनेचे माहूर तालुकाध्यक्ष गजानन कुळकर्णी व किनवटचे तालुकाध्यक्ष नितीन मोहरे यांनी काही महीन्यापूर्वी पक्षाच्या लेटर पॅडवर तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर यांची अवैध रेती उपसा व तस्करी बाबत तक्रार केली होती.पुढे प्रकरण दडपण्यासाठी त्यांच्या कडून खंडणी उकळून पक्षाची प्रतिमा मलिन केल्यामुळे सुप्रिमो राज ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची मनसेतून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहांगीरदार,रवि राठोड व गजानन चव्हाण यांनी दि.25 ऑगस्ट रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
मनसेच्या दोन्ही पदाधिका-यांनी वारंवार तोंडी स्वरूपात सूचना देवूनही गेल्या सहा ते सात महीन्यापूर्वी पासून पक्षासाठी कुठलेही कर्तव्य पार पाडले नाही.पक्ष कार्यापेक्षा पत्रकारितेवर अधिक लक्ष केंद्रित केले.केवळ सामाजिक हितासाठीच पक्षाच्या लेटर पॅडचा उपयोग केल्या जावा अशी अपेक्षा असते.मात्र या दोघांनी त्याचा उपयोग तक्रारीसाठी केला आणि खंडणी उकळून पक्षाची मोठी बदनामी केली असल्याची बाब प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे. पक्ष श्रेष्ठींची परवानगी न घेता लेटर पॅडचा तक्रारीसाठी वापर करणे,त्यामाध्यमांतून खंडणी वसूल करून पक्षाची प्रतिमा मलिन करण्याचा ठपका ठेवून गजानन कुळकर्णी व नितीन मोहरे या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली असून यापुढे या दोघांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाशी कुठलाही सबंध राहणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार व रवि राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले आहे.

१) मॉन्टीसिंघ जहाँगीरदार जिल्हाध्यक्ष नांदेड़
२)रवि राठोड ग्रामीण जिल्हाध्यक्ष नांदेड़
३)गजानन चव्हाण ग्रामीण जिल्हाध्यक्ष ,नांदेड़
4) उषा ताई नरवाडे महिला जिल्हा अध्यक्ष
जिल्हाध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्ह्या नांदेड़