पशुधनावरील साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबिर

0
87

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातीनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

 

 

पाराशिवनी :- पशुधनावर लंपी स्किन डिसिज या विषाणूजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगाच्या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच या रोगाबाबत पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पाराशिवनी तालुका तिल– कन्हान योथिल पशु वैद्यकिय दवाखाना कन्हान- च्या वतीने कन्हान जवळील निलज व बोरी(रानी)येथे आज मंगलवार ला लसीकरण व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गोडेगाव सर्कल च्या जिल्हा परिषद सदस्य व्यंक्ट कोरमोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने पंचायत सीमती सदस्य नरेश अखाळु मेश्राम,निलज च्या संरपंचा ,ग्राम पंचायत सदस्य, ईश्वर कारेमोरे( सुपर वाईजर,मदर डेयरी) ,योगेश भुते (संचालक, दुध संकलन केन्द्र ,निलज), डाक्टर प्रिती वालके (पशुधन विकास अधिकारी ), कृषीकन्या कृषिदूत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या शिबिरामध्ये प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पशुपालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती वालके यांनी या साथीच्या रोगाबद्दलप्रातिबंधक उपाय व योजना बद्दल गावातील पशुपालकांना मार्गदर्शन केले. १५०पशुधूनाचा उपचार कर०यात आला,शेतकरी, गावकर्‍यांसह, पशुपालकांचाही या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, यावेळी कन्हान पशु चिकित्सक विभागाच्या सुहास पुड ,शंकर पानुरकर कर्मचारी सदस्यांची उपस्थिती होती.