गणेश मूर्ती व निर्माल्या विसर्जनासाठी विसर्जन रथाची सुविधा , पोलीस विभागाचा अभिनव उपक्रम

262

 

वणी : परशुराम पोटे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेश उत्सवा साठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीच्या आधीन राहून गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. नियमावली नुसार गणेश विसर्जना करीता गर्दी होऊ नये या साठी यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांच्या संकल्पनेतून संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात पोलीस विभागा तर्फे जणतेसाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. गणपती बाप्पाचे विसर्जन घरच्या घरीच करावे किंवा पोलीस विभागा मार्फत श्री गणेशजींची मुर्ती व निर्मल्य विसर्जण रथ वणीकरांच्या सेवेकरिता तयार करण्यात आलेला आहे. वणीकर जनतेने या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार वैभव जाधव यांनी केले आहे. या उपक्रमाद्वारे विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळून आपण कोरोनाला हरवू शकतो अशे मत ठाणेदार वैभव जाधव यांनी व्यक्त केले.