नागपुर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे कोरोना पाँजिटीव मी पाँजिटीव…. We Shall Win..- तुकाराम मुंडे चा संदेश

375

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

नागपुर : २५ आँगस्ट २०२०
नागपुर महानगरपालिका चे आयुक्त तुकाराम मुंडे यांना नुकतीच कोरोना ची लागन झाली असुन त्यांनी ही माहिती ट्वीटर व फेसबुक च्या माध्यमातून नागपुरकरांना दिली आहे.
फेब्रुवारी मध्ये नागपुर चा पदभार घेताबरोबर मुंडे यांचेवर कोरोना संकट पेलण्याची मोठी जबाबदारी आली होती. वेगवेगळे उपक्रम, आयडिया वापरुन त्यांनी कोरोना पाँजिटीव ची संख्या वाढण्यावर अंकुश लावला. परिणामी त्यांनी कडक निर्णय सुद्धा घेतले. त्यामुळे नागपुरातील भाजपा कांग्रेस चे नगरसेवक व महापौर यांचेशी सतत खटके उडत राहिले. मागील ५ महिन्यापासून महापौर संदीप जोशी, दयाशंकर तिवारी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांचेवर ताशेरे उडवत काम करण्यास अडचणी निर्माण केल्या. यातच त्यांना नागपुरातुन बदलीसाठी खुप प्रयत्न झाले पण तुकाराम मुंडे हे आपल्या क्रृतीवर ठाम राहिले.
कोरोना संकटात विविध अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतांना तसेच कोव्हीड सेंटरला आवश्यक त्या वैद्यकीय उपाययोजना, उत्क्रृष्ठ जेवण, विलीनीकरण कक्ष, बेड ची क्षमता याकडे लक्ष ठेवता ठेवता आज मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांना कोरोना ची लागन झाली. कोरोना पेशंट च्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोना चा प्रादुर्भाव झाला.

फेसबुकवर मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिलेला संदेश
👇👇
मी पॉझिटिव्ह…We Shall Win…!

कोरोनाच्या संक्रमण काळात यंत्रणा प्रमुख म्हणून कार्य करताना अनेकांच्या संपर्कात आलो. काळजी म्हणून काही वेळा कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीत ‘पॉझिटिव्ह’ आलो. लक्षणे नसताना पॉझिटिव्ह आल्याने नियमानुसार ‘गृह विलगीकरणा’त (Home Isolation) आहे. मागील 14 दिवसात जे माझ्या संपर्कात आले असतील, त्यांनी स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.

मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला. आजही देत आहेत. स्थानिक प्रशासन म्हणून नागपूर महानगरपालिका आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे समजून वागा, असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी. कोरोनाच्या नागपुरातील एन्ट्री नंतर अत्यावश्यक सेवा म्हणून कार्य करताना माझ्यासोबत माझ्या प्रत्येक सहकाऱ्याने आवश्यक ती सर्व काळजी घेतली. मात्र, सेवा देताना कुठे ना कुठे कोरोना रुग्णांशी संपर्क येत गेला. यातून मनपाचे कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली. आज मी स्वतः पॉझिटिव्ह निघालो. काळजी म्हणून मी गृह विलगीकरणात राहीन. परंतु, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून नागपुरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. कारण मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो.

We shall Win…!