आकोट तालुक्या मधील नुकसान ग्रस्त भागातील शेतीची पाहणी

176

 

आकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

दिनांक 25 आॅगस्ट रोजी जि. प.अकोला कृषी व पशु संवर्धन सभापती पंजाबराव वडाळ व अकोला जिल्हा कृषी अधिकारी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सतत येणाऱ्या पावसामुळे पिके खराब झाली. तसेच मुंग पिकावर आलेला व्हायरस मुळे संपूर्ण जिल्हा मधील मुंग शेतकऱ्याच्या हातातून गेला आहे. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या करिता आज संपूर्ण अकोट तालुका मधील नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करण्यात आली. तसेच फवारणी मुळे कीटकनाशकाची कश्या प्रकारे काळजी घ्यावी या संबांधीत मार्गदर्शन कृषी अधिकारी यांनी केले. यामध्ये उपस्तिथ तालुका कृषी अधिकारी थूल साहेब व देशमुख साहेब टाकळी सरपंच मंगेश ताडे. रेल सरपंच शंकर घुगरे,करत वाडी सरपंच सुदर्शन कीरडे व शेतकरी आदीची उपस्थिती होती.