वृक्षारोपण करून जन्मदिवस साजरा

182

 

प्रतिनिधी:रोहन 

मारेगाव:तालुक्यातील महागाव येथे जन्मदिनाच्या औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागीय अध्यक्ष अविनाश लांबट यांनी वृक्षारोपण करून जन्मदिवस साजरा केला.
वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून वृक्षारोपण केलं जाण्याचा आनंद अनुभवण्यासाठी आणि निसर्गातील हिरवाई टिकवण्यात हातभार लावण्यासाठी प्रयत्न करीत राहणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

निसर्गावर विशेष प्रेम असलेले त्यांचे मित्र पवन मिलमिले, संतोष दरवे, अंकुश पिंपळकर, राहुल मेश्राम, मंगेश टेकाम, मुरलीधर बल्की ,गणेश खुसपुरे तसेच इतर मानवासाठी झाडाची मोठे योगदान असल्याचे मानणारे मित्रांची साथ त्यांना मिळाली. वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात निर्धार यावेळी व्यक्त केला. मनात झाड लावल्याशिवाय जमिनीत झाड उगवणार नाही ,त्यामुळे प्रत्येक सुजाण नागरिकांनी एक तरी झाड लावावे व लोप पावत चाललेला निसर्गगाला खुलवावे.