वणी ग्रामीण रुग्णालयात सिझर ची सुविधा सुरू करा -मनसेची मागणी

0
93

 

वणी : परशुराम पोटे

ग्रामीण रुग्णालय वणी येथे सन २०१५ मध्ये मनसेच्या पाठपुराव्याने सिझरची सुविधा सुरु करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला याचा फायदा झाला होता. परंतू आज रोजी ही व्यवस्था बंद पडली आहे.
हि सुविधा बंद पडण्यामागे विद्यमान वैद्यकीय अधिक्षक व काही खाजगी डाँक्टरही कारणीभुत असल्याचा आरोप निवेदनातुन करण्यात आला आहे.
याबद्दल सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी व सिझरची व्यवस्था पुर्वरत चालू करण्यात यावी या संदर्भात माजी आरोग्य सभापती धनंजय त्रिंबके यांचेसह आजिद शेख,लक्की सोमकुवर,अमोल मसेवार,शुभम पिंपळकर,भुषन वैद्य यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले.