तोतलाडोह धरणाचे सर्व 14 दरवाजे आजही उघडे, पेंच व कन्हान नदीपात्र काठावरील लोकांना सतर्कतेचा इशारा

163

पूजा उईके रामटेक तालुका प्रतिनिधी तोतलाडोह : महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरील मुख्य तोतलाडोह धरणाचा जलसाठा 95.86% असल्याने याचे सर्व 14 दरवाजे सुरक्षिततेच्या दृष्टीने उघडलेले असून ते सर्व आजही उघडे आहेत. त्यामुळे त्याखालील 30 किलोमीटर अंतरावरील पेंच धरण सुद्धा भरलेले आहे. विसर्गीत पाणी पेंच व कन्हान नदीला सोडण्यात आले असल्याने त्या नद्यांच्या काठावरील नागरिक, मच्छिमार आणि रहिवाशीदाराना सावधान करण्यात आले असल्याचे रामटेकचे उपविभागीय पाठबंधारे अभियंता राजेश धोटे यांनी सांगितले. सध्या तोतलाडोह धरणातील 14 पैकी 8 दरवाजे हे 0.30 मीटरने तर उर्वरित 6 दरवाजे हे 0.50 मीटरने उघडे आहेत. सीमावरील मध्यप्रदेशात चांगला पाऊस होत असल्याने तोतलाडोहमध्ये पाण्याची आवक निरंतर वाढली आहे. त्यामुळे पाठबंधारे विभाग बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असल्याचे उपविभागीय अभियंता राजेश धोटे यांनी सांगितले आहे.