धक्कादायक घटना, उमरघाट येथे अल्पवयीन बालिकेवर अत्याचार, संशयित आरोपीस अटक

210

 

यवतमाळ/ परशुराम पोटे

मारेगाव तालुक्यातील उमरघाट येथील एका १२ वर्षीय बालिकेवर ३१ वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची खळबळजनक तसेच मानव समाजाला काळीमा फासनारी घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहीती नुसार अनिल नारायण टेकाम (३१)असे बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.
सदर घटना दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजताचे दरम्यान घडली. पिडित बालिकेचे आई वडील शेतात गेले असता पिडित एकटीच घरी खाटेवर झोपून होती, संशयीत आरोपी अनिल याने घरी एकटी असल्याचा फायदा घेत घरात शिरला आणी पिडीतीचे अंगावर चढून लैंगिक अत्याचार केला. दरम्यान पिडीतिने आरडा ओरड केली असता संशयीत आरोपीने घटना स्थळावरुन पोबारा केला.
पिडित घराबाहेर निघून रडत रडत घराशेजारील लोकांना घडलेली आपबिती सांगितली. दरम्यान सायंकाळी पिडीतीचे आई वडील शेतातून येताच, पिडितीने आपल्या सोबत घडलेली सर्व आपबीती सांगितली.मात्र घटनेच्या दिवशी रात्र झाल्याने ऑटो मिळत नसल्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी २४ ऑगष्ट्ला पिडितीचे आई वडील आपल्या बलिकेला घेऊन पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिली.या तक्रारीवरुन मारेगाव पोलिसांनी संशयीत आरोपी अनिल नारायण टेकाम यांचे विरोधात कलम ३५४, ३५४ (अ), ४५२ भांदवी सह कलम ८ लैंगिक अत्याचार अंन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस तात्काळ अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नायक यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार जगदीश मंडलवार, पोउनि/अमोल चौधरी पो.स्टे मारेगाव तपास करीत आहे.