
वणी : परशुराम पोटे
येथील प्रेस वेलफेअर असोसिएशनची सन 2020 ते 2023 या तीन वर्षा करिता कार्यकारणीची निवड करण्यात आली असून अध्यक्ष पदी रवी बेलूरकर तर सचिव पदी तुषार अतकारे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रेस वेलफेअर असोसिएशन हे पत्रकारांच्या न्याय हक्का करिता कार्य करीत आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत आहे.पुढील तीन वर्षाकरीता नवीन कार्यकारणी निवडी करिता येथील नगर वाचनालयात बैठक घेण्यात आली. या निवडणुकीची प्रक्रिया प्रा. महादेव खाडे यांनी निवडणूक प्रक्रीया राबविली,या कार्यकारिणीची निवड अविरोध करण्यात आली असून अध्यक्ष रवी बेलूरकर, उपाध्यक्ष डॉ. किशोर चवणे, सचिव तुषार अतकारे ,सहसचिव जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्ष जावेद पठाण, यांची निवड करण्यात आली तर कार्यकारणी सदस्य म्हणून गजानन कासावार, रमेश तांबे, प्रशांत गोडे, विनोद ताजने, अासिफ शेख, सागर बोढे तर सल्लागार म्हणून ऍड,मूलचंद जैन, माधव सरपटवार, रज्जाक पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी अनिल बिलोरिया, मंगल तेलंग, अमर चतुर्वेदी उपस्थित होते.