मुंडीकोटा कंटेन्मेंट झोन उठणार मंगळवारला व्यापारिवर्गात चर्चा

230

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

तिरोडा : मुंडीकोटा येथील कंटेन्मेंट झोन २ आगष्ट रोजी उपविभागीय यांचे आदेशाने लागू करण्यात आले होते. आज 21 दिवाशांचा काळ लोटलेला आहे. सर्व रुग्ण सुखरूप घरी परतलेले आहेत. येथील आठवडी बाजार आजही बंद आहे. व्यापारी प्रतिष्ठाने बंद आहेत. केवळ ईपास असलेली दुकाने सुरू आहेत. मुंडीकोटा हे व्यापारी केंद्र आहे. जवळपास ५० गावातील लोक मुंडीकोटा येथे ये-जा करतात.

नागपूरहून ये जा करीत असलेल्या एका व्यापाऱ्याने त्याची माहिती दडवून ठेवली. याच दडवलेल्या महितीमधून मुंडीकोटा येथे कोविडचा प्रादुर्भाव झाला. त्याने उक्त माहिती लपवून ठेवली नसती तर कदाचित मुंडीकोटा हे कंटेन्मेंट केंद्र बनले नसते. गावातील अन्य गोरगरीब लोंकांव्दारे प्रादुर्भाव झाला असता तर त्याचे व कुटुंबियांचे जगणे कठीण झाले असते. अशी चर्चा जनमानसात आहे.

कंटेन्मेंट हटले पाहिजे असे जनतेत कोणताही सूर नाही. शिवाय जनतेला कोणताही त्रास देखील नाही. कंटेन्मेंट झोनची मर्यादा ३० आगष्ट असली तरी मुंडीकोटा येथे शेवटचा रुग्ण ७ आगष्ट असा आहे. त्यामुळे येथील कंटेन्मेंट ४ सप्टेंबर पर्यत देखील चालण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही.
असे काही असले तरी मुंडीकोटा येथील व्यापारी प्रतिष्ठाने मंगळवार पासून सुरू केले जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे. यामुळे कंटेन्मेंट झोन अवज्ञा होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. प्राशन स्तरावरून तसे कुठलेही आदेश नसल्यास मंगळवारला कंटेन्मेंट झोन आदेशाचे उल्लंघना अंतर्गत फार मोठा महसूल गोळा होण्याची चिन्हे आहेत. याची खबरदारी प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

प्रतिक्रिया :
वरिष्ठांचे आदेश आल्यास कंटेन्मेंट झोन उठविण्यात येईल. कंटेन्मेंट झोनचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

तलाठी : एम.टी.मलेवार मुंडीकोटा.