खळबळजनक घटना, शास्त्री नगरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

155

 

वणी : परशुराम पोटे

शहरातील शास्त्री नगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी उघडकीस आली आहे.
इमरान अयुब अली सैय्यद असे म्रुतक तरुणाचे नाव आहे. काही दिवसापासुन इमरानची पत्नी माहेरी गेली असल्यामुळे इमरान एकटाच रहात होता. अशातच त्याने सतिघाट नाक्याजवळ स्वताचे घर विकत घेतले होते.याच घरात छताच्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले.घटना पंचनामा करुन शव शवविच्छेदनाकरिता येथिल ग्रामिण रुग्णालयात पाठविले आहे.इमरान याने आत्महत्या का केली?याचे कारन मात्र कळु शकले नाही.पुढिल तपास पोलीस करित आहे.