धोबी समाजा करिता समाज मंदिरासाठी जागेची पाहणी करताना जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हक्काचा समाज मंदिर असल्यास विविध सामाजिक कार्यक्रम होणार मंदीरात

138

 

प्रतिनिधी/रमेश बामनकर

गुड्डीगुडम:-अहेरी तालुक्यात धोबी समाजाचे बांधव जास्त प्रमाणात असल्याने गावामध्ये सामाजिक व इतर कार्यक्रमासाठी समाज मंदिर नसल्याने समाज बांधवांना त्रास होत होता.आलापल्ली येथील काही धोबी समाजाचे नागरिक जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांच्याकडे मागणी केले होते.
धोबी समाजाचे अडचण पाहून जिल्हा अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार यांनी आलापल्ली येथील धोबी समाजासाठी समाज मंदिर बांधकामसाठी जागेची पाहणी केले असून लवकरात लवकर आलापल्ली येथे धोबी समाजासाठी भव्य समाज मंदिर उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडलावार,माजी सरपंच दिलीप गंजीवार,पिंटूभाऊ कुसनाके,जुलेख शेख,परशूट कर,मोरेश्वर,प्रशांत गोडशेलवार आणि आलापल्ली येथील धोबी समाजाचे प्रतिष्ठित नागरिक आणि समाज बांधव उपस्थित होते