नागपुरे कृषी केंद्र बिर्सी व्यापाऱ्याच्या दुकानातून चोरट्यांणी केला साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

295

 

प्रतिनिधी/अतित डोंगरे

मुंडीकोटा/तिरोडा : बिर्सी येथील भुमेश्वरी हेमंतकुमार नागपुरे यांचे फिर्यादी वरून चोरीचा गुन्हा झाल्याचा २२ आगष्ट रोजी उघड झाले. यात ४ लक्ष ४६ हजार,८०० रुपयांचे मुद्देमालाची नोंद करण्यात आलेली आहे.

सविस्तर असे की, प्रसिद्ध व्यापारी हेमंत नागपुरे बापलेकांचा नुकतेच निधन झाले आहे. यांचे बिर्सी येथे एक मोठे कृषी केंद्र आहे. ते एक सावकार देखील होते. त्यांचा पूर्ण व्यवहार हा बिर्सी येथील दुकानातूनच व्यवहार चालत होता. त्यांचा पूर्ण परिवार हे कोविड प्रदूर्भावाने ग्रासले असल्याने व्यापारी हेमंत नागपुरे, पत्नी, मुलगा, सून, नातीन यांना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपचारार्थ ठेवण्यात आले होते. जागची कामे जागी राहिलेत. नेमका सगळीकडे कोविड विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने काही ठिकाणी (कंटेन्मेंट झोन) प्रतिबंधीत क्षेत्र निर्माण झाले आहेत. तसे बिर्सी हे गाव देखील प्रतिबंधीत झाले आहे. याच दरम्यान ९ व १० आगष्ट रोजी बापलेकांचे उपाचारादरम्यान निधन झाले. चोरांनी याच आपत्तीला आपली संधी मानून हेमंत नागपुरे यांचे बिर्सी येथील दुकान आणि घरात चोरीने घुसून त्यांचा साडेचार लक्ष रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. पण नेमके चोरांनी आपला चोरीचा डाव कधी साधला हे अद्याप निष्पन्न होऊ शकले नसले तरी चोरीची घटना २२ आगष्टला उघड झाली असल्याने त्याच दिवशी नोंद घेऊन पुढील तपास उपविभागीय अधिकारी यांचे मार्गदर्शनात तिरोडा पोलीस निरीक्षक करीत आहेत.

चोरी गेलेल्या मुद्देमालात सोन्याचा राणी हार, नेकलेस, बांगड्या, नथ, कानातील झुमके, अंगठी, नाकातील फुल्या, नाकातील नथ, इत्यादी सामानाचा समावेश आहे. तर चांदीच्या दागिन्यात लहान पायल, मोठे पायल, कमररेचा कर्दन, बिछिया यांचा समावेश आहे. दोन लॅपटॉप, नगदी स्वरूपातील १ लक्ष असा ४ लक्ष ४६ हजार, ८०० रुपये मुद्देमालाची नोंद करण्यात आली आहे.