डीसिपीएस धारकांचा हिशोब पावती सहित द्या तसेच वरिष्ठ निवड श्रेणी चे प्रस्ताव त्वरित निकाली काढा-विजुक्टा

240

प्रशांत चरड़े,
चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि,

डीसिपीएस धारकांचा हिशेब व त्यांच्या पावत्या मिळणे तसेच वरिष्ठ निवड श्रेणी चे प्रस्ताव निकाली काढणे बाबत निवेदन विजुक्टा तर्फे शिक्षणाधिकारी मार्फत मा. शिक्षण सचिव शालेय शिक्षण व मा.शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांना निवेदन देण्यात आले.
शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना DCPS मधून NPS मध्ये वर्ग करण्याचे निर्देशित आहे मात्र DCPS धारक कर्मचाऱ्यांचे आज पर्यंतचे हिशेब अप्राप्त आहे याआधी सुद्धा राज्यातील इतर DCPS कर्मचाऱ्यांच्या खात्यात शासनाने अंशदान दिले होते मात्र शिक्षक यापासून वंचित होते. संघटनेने 2018 मध्ये केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक26 फेब्रुवारी 2019 ला वित्तमंत्री व शिक्षण मंत्रीच्या समवेत झालेल्या बैठकीत लेखी दिलेल्या पत्रानुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाने अंशदान 1182 कोटी व त्यावरील व्याज 130 कोटी मान्य करून वितरित झाले होते तसेच नंतर सुद्धा अंशदान प्राप्त झालेले आहे कर्मचारी आपली कपात नियमित करीत आहेत. मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे हिशेब आणि पावत्या अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत त्वरित 31मार्च 2020 पर्यंत चा संपूर्ण हिशेब व पावत्या त्याचप्रमाणे सहाव्या वेतन आयोगातील DCPS धारक कर्मचाऱ्यांच्या वेतन हप्त्याची थकीत रक्कम त्वरित रोखीने अदा करण्यात यावी.प्रशिक्षण अभावी शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत मात्र आजतागायत प्रशिक्षण घेण्यात आलेले नाही व कोविड 19 च्या
प्रश्वभूमीवर सध्या होणारही नाही प्रशिक्षणाबाबतच्या हलगर्जीपणामुळे हजारो शिक्षकांवर प्रचंड अन्याय होत आहे याआधी विशिष्ट परिस्थितीत वेळोवेळीच्या शासनादेशा द्वारे हमीपत्रावर शिक्षकांचे प्रस्ताव निकाली काढले आहेत त्याच धर्तीवर सध्याच्या परिस्थितीचा विचार करून प्रस्ताव निकाली काढण्याचे आपले स्तरावरून निर्देशित व्हावे आशा विविध मागणीच्या संदर्भात निवेदन सादर करण्यात आले आहेत.
सदर मागण्या मान्य न केल्यास शिक्षकांच्या तीव्र आंदोलनास शासन जवाबदार राहील, असा ईशारा निवेदनातून दिला आहे.
यावेळी विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, सचिव प्रा. दिलीप हेपट, प्रा. महेश यार्दी, प्रा. संघपाल जुलमे, प्रा. रविकांत वरारकर ,प्रा. अशोक बुटले, प्रा. प्रा.जेणेकर, प्रा.सुयोग साळवे, प्रा.प्रशांत बलकी,प्रा. नागपुरे उपस्थित होते.